मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पत्राचाळ प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पुन्हा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा राज्यसभेचे खासदार यांनी ईडीने अटक केली असून ते सध्या कारागृहात आहेत. यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली असून १९ सप्टेंबरपर्यंत त्यांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत असणार आहे. २३ ऑगस्ट रोजी मागची सुनावणी झाली होती त्यावेळी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबर पर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी झाली असता त्यांची पोलीस कोठडी वाढविण्यात आली आहे.
ईडीने पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात राऊत यांच्या पत्नीची चौकशी केली असून राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांनासुद्धा अटक करण्यात आली होती. प्रवीण राऊत यांनी या व्यवहारात मिळालेली काही रक्कम संजय राऊत यांच्या पत्नीच्या बँक खात्यात वर्ग केली आहे. तसेच त्यातून राऊत यांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केल्याचा आरोप ईडीने केला आहे. यानुसार, त्यांना ३१ जुलै रोजी रात्री उशीरा अटक करण्यात आली आहे.