Home क्राईम ‘जय श्रीराम’च्या घोषणांची सक्ती ; औरंगाबादमध्ये एकाला जबर मारहाण

‘जय श्रीराम’च्या घोषणांची सक्ती ; औरंगाबादमध्ये एकाला जबर मारहाण


marhan
 

औरंगाबाद (वृत्तसंस्था) शहरात मध्यरात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास एका मुस्लीम तरुणाला ‘जय श्रीराम’च्या घोषणांची सक्ती करत १० ते १२ जणांच्या जमावाने जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, पिडीत तरुण झोमॅटोचा कामगार असल्याचे कळते.

 

औरंगाबादमध्ये रात्री १२ ते १ वाजण्याच्या सुमारास एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण करण्यात आली. १० ते १२ अज्ञातांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे. २० जुलै रोजी म्हणजे शनिवारीच अशाच प्रकारची एक घटना औरंगाबादमध्ये घडली होती. एका मुस्लिम तरुणाला हडको कॉर्नरजवळ अडवून मारहाण करण्यात आली होती. तसेच त्याला जय श्रीरामच्या घोषणा देण्यास भाग पाडले गेले होते. याप्रकरणीही पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता. इम्रान पटेल असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव होते. तो एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो. ही घटना ताजी असतानाच तशीच एक घटना औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा घडली आहे.


Protected Content

Play sound