जळगाव प्रतिनिधी । येथील कै.वैद्य भालचंद्र शंकर जहागिरदार प्रतिष्ठानतर्फे उद्या 16 जुलै रोजी आय.एम.ए. हॉलमध्ये ज्येष्ठ डॉक्टरांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुपौर्णिमेनिमित्त गेल्या 25 वर्षांपासून प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ डॉक्टरांचा कृतज्ञता म्हणून सत्कार करण्यात येतो. यंदा ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ञ डॉ.उल्हास पाटील व बालरोगतज्ञ डॉ.राजेंद्र पाटील हे सत्कारार्थी आहेत. डॉ.उल्हास पाटील यांनी जिल्हा रुग्णालयात अनेक वर्ष मानसेवी डॉक्टर म्हणून तर गोदावरी हॉस्पिटल आणि आता गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णसेवा देत आहे. डॉ. राजेंद्र पाटील हे 1986 पासून चैतन्य मुलांच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून कार्यरत आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैद्य जयंत जहागिरदार यांनी केले आहे.