जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वाघूर धरण पूर्णपणे भरले असून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने प्रशासनाने सावधगिरीचा इशारा दिला आहे.
वाघूर धरण हे गेल्या दोन वर्षांपासून पूर्णपणे भरले होते. यंदा मात्र पहिल्या टप्प्यात धरण पूर्ण भरले नाही. मात्र परतीच्या पावसामुळे धरणाच्या जलपातळीत चांगली वाढ झाली. यामुळेच आज रोजी धरण पूर्णपणे भरलेले आहे. परिणामी आज सायंकाळी पाच वाजेपासून दोन दरवाज्यांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे.
वाघूर धरणाचे दोन दरवाजे उघडल्यामुळे नदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. परिणामी खालील बाजूच्या गावांमधील ग्रामस्थांनी नदीपात्रात जातांना सावधगिरी बाळगावी असा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.