जळगाव (प्रतिनिधी)। विश्वव्यापी अध्यात्मिक संस्था आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ अर्थात इस्कॉनतर्फे आज दुपारी 12 वाजता जगन्नाथ रथ यात्रा काढण्यात आली. चैतन्य जीवनदास यांनी सहभाग नोंदविला होता.
इस्कॉनतर्फे दरवर्षी जगन्नाथ रथ यात्रेचे मोठे आयोजन करण्यात येते. यंदाही मोठ्या प्रमाणावर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी दिवसभर विविध कार्यक्रम घेण्यात आले. यात दुपारी १२ वाजता शहरातील शिवतीर्थ मैदानापासून रथोत्सवाला सुरुवात करण्यात आली. रथ नवीन बसस्थानक स्वातंत्र्य चौक, बहिणाबाई उद्यान, गोकुळ स्वीट मार्ट, नेहरू चौक, महापालिका, टॉवर चौक, जुने बसस्थानक, गुजरात स्वीट मार्ट मार्गे बालगंधर्व नाटयगृह येथे समारोप होईल. सायंकाळी ६ वाजता नाट्यगृहात सांस्कृतिक कार्यक्रम होईल. यानंतर भाविकांनी आणलेल्या ५६ ते १००१ प्रसाद भोग म्हणून अर्पण केला जाईल. कार्यक्रमास वृंदावन येथील वज्रविलास प्रभू उपस्थित राहणार असल्याची माहिती इस्कॉन यांनी दिली आहे.