जळगाव प्रतिनिधी । येथील जेसीआय आणि धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यामानाने सॅनिटरी नॅपकीन किटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महिला सशक्तिकरण व महिला स्वच्छताबाबत जानजागृती व्हावी यासाठी शहरातील जेसीआय नेहमी सहभगी होत असते. यावेळी जेसीआयचे अध्यक्ष प्रतिक शेठ यांच्या संकल्पनेतून ही किट बसविण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष धनाजी नाना चौधरी महाविद्यालय प्राचार्य डॉ.आर.बी.वाघुळदे, जेसीआय जळगाव अध्यक्ष प्रतीक मनीष शेठ, आयपीपी जेसी वरुण जैन, माजी अध्यक्ष जेसी रफीक शेख यानी महिलांच्या सशक्तिकरणाबाबत माहीती दिली. सूत्रसंचालन प्रोजेक्ट डायरेक्टर जेसी प्रियंका बऱ्हाडे यानी केले. लेडीज फोरम अध्यक्ष देवयानी पाटील यानी मार्गदर्शन केले, सेक्रेटरी जेसी मोइन अहमद, जेसी प्रमोद गहलोत, जेसी शरद मोरे व समस्त कॉलेज विद्यर्थी व जेसीआय जळगाव पदाधिकारी उपस्थित होते.