जे. एस. पाटील यांची दिपनगर मागासवर्गीय शाखेस भेट

bhet

भुसावळ प्रतिनिधी । येथील ऑल इंडिया रेल्वे कर्मचा-यांची संघटनात्मक बांधणी करिता स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे प्रमुख केंद्रीय सल्लागार जे.एस. पाटील यांनी मागासवर्गीय संघटन शाखेने दिपनगर येथे भेट दिली.

याबाबत माहिती अशी की, सर्व पदाधिकारी व सभासद यांची संघटनेविषयी माहिती घेऊन स्थानिक समस्या जाणून घेतल्या आहेत. त्याचप्रमाणे वर्षभराचा संघटनेचा लेखाजोखा तसेच नवीन सभासद जोडण्याचे आव्हान व आरक्षणाविषयी विविध राज्यात चालू असलेल्या केसेस बद्दल सविस्तररीत्या मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जे.एस. पाटील यांचे स्वागत दीपनगर शाखेचे सल्लागार डी.डी. पिंपळे तथा संघटनेचे अध्यक्ष मिलिंद खंडारे, सचिव सी.एम. सपकाळे, कार्याध्यक्ष अख्तर तडवी, प्रसिद्धीप्रमुख रोशन वाघ, संघटन सचिव विजय वाघ तथा संघटनेतील सभासदांनी केला. याप्रसंगी महावितरण महापारेषण येथील सुद्धा संघटनेचे सभासद व स्वतंत्र विद्युत कंत्राटी कामगार दिपनगरचे पदाधिकारी सभासद व आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन दीपनगर शाखेचे सचिव सी.एम. सपकाळे यांनी केले आहे.

Protected Content