अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात आदित्य आणि उध्दव ठाकरे यांनी खोक्यांचे राजकारण सुरू केल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे.
आज नवनीत राणा म्हणाल्या की, खोक्यांचे खरे राजकारण हे ठाकरे कुटुंबाने राज्याच्या राजकारणात सुरू केले आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीवर बसून मुंबई महानगरपालिकेत ‘खोक्याचं’ राजकारण सुरू केलं. किशोरी पेडणेकर महापौर असताना त्यांनी किती खोके मातोश्रीवर पोहचवले, हे संपूर्ण जनतेला माहिती आहे. खोक्यांशिवाय उद्धव ठाकरे यांचं पानही हलत नाही. खोक्याची प्रथा ही अदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सुरू केली आहे, असं राणा म्हणाल्या.
दरम्यान, नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांच्या विधानावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोण काय अल्टीमेंटम देते याकडे माझं लक्ष नसतं. माझ्या विरोधात कोणी आंदोलन केलं याची मी पर्वा करत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा बोलवतील तेव्हा केव्हाही जाऊ माझा कोणाशी वाद नाही.मी सिद्धांताची लढाई लढते, असंही राणा म्हणाल्यात.