केळी उत्पादक शेतकऱ्यांना हिशेब पावती देणे बंधनकारक – सभापती राकेश फेगडे

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी शेतमालाचे व्यवहार करतांना पूर्ण झाल्यावर हिशेब पावती देण्याचा निर्णय बंधनकारक केला आहे. सर्व केळी जनरल कमिशन एजंट्स यांनी हिशेब पावती बाजार समितीने ठरवून दिलेल्या फॉरमॅट मध्ये असावी, यासाठी बाजार समितीने हिशेब पावतीचे पुस्तक छापून तयार केलेली आहेत. सर्व केळी जनरल कमिशन एजंट्ससाठी अल्पदराने केळी हिशेब पावती पुस्तके उपलब्ध असून कार्यालयीन वेळेत बाजार समितीत येऊन पुस्तके विकत घेऊन जावीत.

केळी व्यवहार होतांना बाजार समितीच्या हिशेब पावतीवर शेतकऱ्यांना हिशेब देणे आवश्यक आहे. हिशेब पावती शेतकऱ्यांना न दिल्यास अथवा परस्पर व्यवहार केल्याचे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल अशी सूचना करण्यात आली आहे.

सदरील हिशेब पावत्या दि. ०१ नोव्हेंबर २०२४ पासून देणे बंधनकारक करण्यात आल्या असून दि. ३१ ऑक्टोबर २०२४ चे आत सर्व लायसेन्सधारक केळी जनरल कमिशन एजंट्स यांनी बाजार समिती कार्यालयातून पावती पुस्तके घेऊन जाणे आवश्यक आहे. दि. ०१ नोव्हेंबर २०२४ नंतर हिशेब पावती दिलेली नसल्याचे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, याची नोंद घ्यावी.

 

Protected Content