जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आयएसओ मानांकन प्रदान सोहळा

जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांच्याहस्ते पोलीस आराम कक्षाचे उद्घाटन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुका पोलीस ठाण्याला आयएसओ दर्जा मिळाल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांच्याहस्ते आयएसओ मानांकन प्रदान सोहळा आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आराम कक्षाचे उद्घाटन शुक्रवारी १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी पोलीस ठाण्याची पाहणी करत येथे असलेल्या  सोयी सुविधांची माहिती जाणून घेतली.

याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावीत, तालुका पोलीस ठाण्याचे परिविक्षाधिन पोलीस उपअधिक्षक आप्पासो पवार, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्यासह आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी परिविक्षाधिन पोलीस उपअधिक्षक आप्पासो पवार यांना जळगाव तालुका पोलीस ठाण्याची धुरा संभाळली. आप्पासो पवार यांची ही पहिलीच पोस्टींग असल्याने त्यांनी गेल्या तीन महिन्यांत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्याने तालुका पोलीस ठाण्याचा चेहरामोहरा बदलविण्याची संकल्पना मांडली. त्यानुसार तालुका पोलीस ठाणे सुजज्ज तयार झाले आणि आयएसओ मानांकन मिळाली. शिवाय याचवेळी किमान १० पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आराम कक्षाची देखील उभारणी करण्यात आली आहे. याचे उद्घाटन पोलीस अधिक्षक एम राजकुमार यांच्याहस्ते करण्यात आले.  आप्पासो पवार यांनी कमी कालावधीत त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतूक पोलीस अधिक्षक यांनी केले.

 

Protected Content