इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | इराणमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले आहे. अजरबैजानवरुन परतताना इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. खराब हवामानामुळे इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टर कोसळले असून काल संध्याकाळपासून या हेलिकॉप्टरचा हार्ड लँडिग कळले. त्यामुळे हेलीकॉप्टरशी संपर्क होत नव्हता. खराब हवामानामुळे बचाव पथकाला हेलिकॉप्टरचा शोध लावण्यात अनेक अडचणी येत होत्या.

टर्कीच्या ड्रोनने या हेलिकॉप्टरचा शोध लावला. या ड्रोनने एक हीट सोर्स शोधून काढले. तोच हेलिकॉप्टरचा ढिगारा होता. टर्कीच्या अधिकाऱ्यांनी तेहरानच्या वरिष्ठांना घटनास्थळाची माहिती दिली. रईसी अजरबैजान प्रांताच्या दौऱ्यावर गेले होते. मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना इराणची राजधानी तेहरानपासून 600 किलोमीटर (375 मैल) उत्तर-पश्चिमेला अजरबैजान देशाच्या सीमेला लागून असलेल्या जुल्फा शहराजवळ झाली. या हेलिकॉप्टरमध्ये राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री हुसैन अमीराब्दुल्लाहियन, पूर्व अज़रबैजानचे अयातुल्ला अल-हाशेम आणि पूर्व अजरबैजान प्रांताचे गवर्नर मालेक रहमतीसोबत त्यांचे अंगरक्षक सुद्धा होते.

Protected Content