तेहरान वृत्तसंस्था । युक्रेनचे प्रवासी विमान हे चुकीने पाडले गेल्याची कबुली आज इराणतर्फे देण्यात आली आहे. या अपघातात तब्बल १७६ प्रवासी ठार झाले होते.
युक्रेनच्या विमान अपघाताबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. हे विमान मानवी चुक होती. हे विमान क्षेपणास्त्र हल्ल्यात चुकून पाडलं, अशी कबुली आज इराणी लष्करातर्फे देण्यात आली आहे. इराणच्या सरकारी माध्यमानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. युक्रेनचे जे विमान बुधवारी अपघातग्रस्त झाले हे विमान तेहरान येथील विमानतळावरून उडाल्यानंतर कोसळलं होतं. या अपघातात १७६ जण ठार झाले, त्यात कॅनडाच्या ६३ नागरिकांचा समावेश होता. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी आधीच हा घातपाताचा प्रकार असल्याची शंका व्यक्त केली होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.