Home क्रीडा आयपीएल 2026 : २८ मार्चपासून क्रिकेटचा महासंग्राम ; RCB विरुद्ध SRH यांच्यात...

आयपीएल 2026 : २८ मार्चपासून क्रिकेटचा महासंग्राम ; RCB विरुद्ध SRH यांच्यात उद्घाटन सामना


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० क्रिकेट स्पर्धा असलेल्या Indian Premier League (आयपीएल) च्या 2026 हंगामाचे वेळापत्रक अखेर जाहीर झाले असून २८ मार्चपासून क्रिकेटप्रेमींना थरार अनुभवायला मिळणार आहे. यंदाच्या १९व्या हंगामाची सुरुवात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याने होणार असून हा उद्घाटन सामना बेंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

आयपीएल 2026 च्या पहिल्या टप्प्यातील सामने विविध शहरांमध्ये खेळवले जाणार असून प्रत्येक संघ आपल्या मोहिमेची दमदार सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. उद्घाटन सामन्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २९ मार्च रोजी पाच वेळा विजेता ठरलेला मुंबई इंडियन्स संघ कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर मैदानात उतरणार आहे. या सामन्याकडे दोन्ही संघांच्या चाहत्यांचे विशेष लक्ष लागले आहे.

तिसऱ्या दिवशी ३० मार्च रोजी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात गुवाहाटी येथे सामना रंगणार आहे. त्यानंतर ३१ मार्च रोजी पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात मुल्लांपूर येथे लढत होईल. एप्रिलच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ एप्रिलला लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लखनौ येथे सामना खेळवला जाईल.

२ एप्रिल रोजी कोलकाता येथे कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होईल. ३ एप्रिलला चेन्नईमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज आमनेसामने येतील. ४ एप्रिल रोजी दुहेरी सामने ठेवण्यात आले असून दिल्लीमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना होईल, तर अहमदाबादमध्येगुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगेल.

५ एप्रिलला हैदराबादमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स  यांच्यात सामना खेळवला जाईल. त्याच दिवशी बेंगळुरूत Royal Challengers Bengaluru आणि Chennai Super Kings यांच्यात हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे. ६ एप्रिल रोजी कोलकाता येथे Kolkata Knight Riders आणि Punjab Kings यांच्यात सामना होईल.

७ एप्रिल रोजी गुवाहाटी येथे राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने येतील. ८ एप्रिलला दिल्लीमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. ९ एप्रिल रोजी कोलकाता येथे कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स  यांच्यात लढत होईल.

१० एप्रिलला गुवाहाटी येथे राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सामना खेळवला जाईल. ११ एप्रिल रोजी दुहेरी सामने होणार असून मुल्लांपूर येथे पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगेल, तर चेन्नईमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने येतील.

१२ एप्रिल रोजीही दोन सामने होणार असून लखनौ येथे Lucknow Super Giants आणि Gujarat Titans यांच्यात सामना खेळवला जाईल. त्याच दिवशी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर Mumbai Indians आणि Royal Challengers Bengaluru यांच्यात मोठी लढत होणार आहे.

आयपीएल 2026 च्या पहिल्या टप्प्यातील हे सामने क्रिकेटप्रेमींसाठी मोठा उत्सव ठरणार असून सर्व संघ विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडी घेण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच मोठ्या संघांमधील हाय-व्होल्टेज सामने रंगणार असल्याने यंदाचा हंगाम अधिक रोमांचक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound