मुंबई वृत्तसंस्था । जगातील सर्वात मोठी लीग म्हणून ओळखली जाणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाची तारिख निश्चित झाली आहे. आयपीएलच्या १३व्या हंगामाला येत्या २९ मार्चपासून सुरुवात होणार आहे. यातील पहिला सामना वानखेडे मैदानावर होणार असून गजविजेते मुंबई इंडियन्स आपल्या घरच्या मैदानावर आयपीएलच्या नव्या हंगामाचा शुभारंभ करतील.
आयपीएल २०२० साठी १९ डिसेंबरला लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावानंतर मूळ स्पर्धेला सुरूवात कधी होणार याबाबत चाहत्यांना खूप उत्सुकता लागली आहे. याबाबत दिल्ली कॅपिटल्स संघाचे पदाधिकारी यांनी माहिती दिली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मला सांगण्यात आले आहे आयपीएल २०२०ची सुरुवात २९ मार्चला मुंबई येथून होईल. याचा अर्थ असा की ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंचा समावेश सुरुवातीच्या काळात होणाऱ्या IPL सामन्यांमध्ये होऊ शकणार नाही. कारण या काळात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात टी २० मालिका असणार आहे. तर इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका ३१ मार्चला संपणार आहे.