Home राज्य मोदींच्या शपथविधीसाठी पाक वगळता जगभरातील नेत्यांना आमंत्रण

मोदींच्या शपथविधीसाठी पाक वगळता जगभरातील नेत्यांना आमंत्रण



नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गुरुवारी, ३० मे २०१९ या दिवशी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी कार्यक्रमाला बिम्सटेक देशांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले असले तरी, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मात्र आमंत्रण देण्यात आलेले नाही.

 

बिम्सटेक देशांमध्ये बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि भुतान, किरगिझस्तान आणि मॉरिशस या देशांचा समावेश आहे. ‘प्रथम शेजार’ या धोरणानुसार भारताने अन्य देशांना आमंत्रित करण्यापूर्वी आपल्या शेजारी राष्ट्रांना आमंत्रणे धाडली आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. यातून पाकिस्तानला वगळून भारताने पाकिस्तानाला एक प्रकारे इशाराच दिल्याचे बोलले जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound