जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गुरुदेव सेवा आश्रम येथील श्रद्धेय श्री.श्याम चैतन्य जी महाराज यांना अयोध्येच्या प्रभू श्रीराम मंदिर उद्घाटनासाठीचे निमंत्रण देण्यात आले.
हे आमंत्रण प्रांत मंत्री योगेश्वरजी गर्गे ,प्रांत सहमंत्री ललित भाऊ चौधरी ,प्रांत सहधर्माचार्य प्रमुख,बाळासाहेब नागरे जिल्हा उपाध्यक्ष गजानन लोणारी, जिल्हा सहसंयोजक प्रवीण सुशीर, डॉक्टर अविनाश कुरकुरे सेवा प्रमुख यांच्या माध्यमातून देण्यात आले. जामनेर तालुक्यासाठी तसेच जळगाव जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद असलेली ही बाब की प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटनासाठी जिल्ह्यातून श्रद्धेय श्री श्याम चैतन्य जी महाराज यांनाही निमंत्रण देण्यात आले आणि ब्रह्मलीन परमपूज्य लक्ष्मण चैतन्य जी बापू यांचे कृपा पात्र शिष्य असलेले श्री श्याम चैतन्य जी महाराज यांनाही निमंत्रण देण्यात आले असून चैतन्य साधक परिवारामध्ये सुद्धा उत्साहाचे अध्यात्मिक वातावरण आहे. यावेळी श्री. श्याम चैतन्य जी महाराज यांनी सांगितले की प्रभू श्रीरामांचे विचार जन सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार!