धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव नगरपालिकेत रमाई घरकुल योजनेत झालेल्या घोटाळ्या चौकशी करून लाभार्थ्यांना हप्त्याची रक्कम अदा करावी या मागणीसाठी ऑल इंडीया पँथर सेनाच्या वतीने धरणगाव मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धरणगाव नगरपालिकेतर्फे रमाई घरकुल योजनेंतर्गत मंजूर झालेल्या लाभधारकांना केंद्र सरकारच्या आदेशान्वये सन २०१३ पासून ज्यांची प्रकरणे रमाई घरकुल योजनेत मंजूर झालेली आहे. त्यांच्याकडून सर्वतोपरी कागदपत्रे तयार करून कोणतीही अटक न घालता पहिला हप्ता देण्यात आला. दुसऱ्या हप्त्यात मागणी केली असता टाळाटाळ केली जात आहे. अनेक त्रृटी काढून गरीब घरकुल धारकांना वेठीस धरण्यात आले. अत्यंत हातावर मोलमजूरी करून काहींनी कर्ज काढून थोडफार बांधकाम केले. त्या लोकांनी धरणगाव नगरपालिका प्रशासनाला विनंती याचना करून आजपर्यंत वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या योजनांची चौकशी करून थकीत रक्कम लाभार्थ्यांना त्वरीत अदा करावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले. या निवेदनावर ऑल इंडीया पँथर सेनेचे जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनिल सोनवणे यांची स्वाक्षरी आहे.