जळगाव, प्रतिनिधी | येथील जळगाव माहेश्वरी विवाह सहयोग समितीतर्फे रविवार दि. २५ ऑगस्ट रोजी एमआयडीसी परिसरातील आदित्य लोन्स येथे अखिल भारतीय वधू – वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
संमेलनाने रौप्यमहोत्सवी वर्ष पूर्ण करून यंदा २६ वे आयोजन केले आहे. सकाळी ९ वाजता छत्तीसगड येथील माजी खासदार प्रदीप गांधी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यानंतर देशभरातील सुमारे ५५० वधू वर हे त्यांचा परिचय मंचावर देणार आहेत. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वधू वर सूचीचे प्रकाशन देखील होईल. तसेच “माहेश्वरी विवाह सहयोग” या मोबाईलवरील एपचेही लोकार्पण होणार आहे. दिवसभरात वधू वर आणि त्यांचे पालक एकमेकांशी परिचय करणार असून यासाठी देशभरातून माहेश्वरी समाजातील नागरिक उपस्थित राहणार आहेत. तरी समाजातील नागरिकांनी या संमेलनाला उपस्थिती द्यावी असे आवाहन अध्यक्ष शामसुंदर झंवर आणि सचिव सुरजमल सोमाणी यांनी केले आहे.