‘दिलखुलास’ कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची मुलाखत

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री  गुलाबराव पाटील यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर  शनिवार दि. 26 मार्च व सोमवार दि. 28 मार्च 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.  वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

राज्यात राबविली जाणारी अटल भूजल योजना, या योजनेचे महत्त्व, तिची सद्यस्थिती आणि उद्दीष्ट याविषयी सविस्तर माहिती या मुलाखतीतून देण्यात आली आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!