मॅंचेस्टर (वृत्तसंस्था) वर्ल्डकप स्पर्धेत भारत-पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी संघामध्ये आज मँचेस्टरमध्ये सामना सुरु आहे. परंतू ४६.४ षटकात भारत ४ बाद ३०५ धावांवर खेळत असतांना पाऊस सुरु झाला आणि खेळ थांबवा लागला.
सामन्याची नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. भारतीय संघात शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्याने विजय शंकरला संधी मिळाली आहे. तर पाकिस्तानने दोन फिरकी गोलंदाजांना संघात सामील करून घेतले आहे. दरम्यान, रोहित शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेत ८५ चेंडूमध्ये आपले शतक पूर्ण केले. त्याने ३४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. पण नंतर तो १४० धावांवर बाद झाला. तर थोड्याच वेळात सामन्याला पुन्हा सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे.