मुंबई प्रतिनिधी । डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकरणातील संशयित डॉ. भक्ती मेहेरला आज दुपारी ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटू लागले आहेत.
याबाबत वृत्त असे की, जळगाव येथील रहिवासी असलेल्या डॉ. पायल तडवी यांचा जातीच्या आधारावर मानसिक छळ करून त्यांना आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचे प्रकरण आता देश पातळीवर गेले आहे. देशभरातून याचा अतिशय तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी मुंबई येथील नायर हॉस्पिटलच्या तिच्यासोबत राहणार्या डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती महिरे व डॉ. अंकिता खंडेलवाल या तिन्हींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आज दुपारी यातील डॉ. भक्ती मेहेरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
तत्पूर्वी पायल तडवी हिच्या पालकांनी आज वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीश महाजन यांची भेट घेऊन या प्रकरणी आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.