Home Cities अमळनेर अमळनेरात जागतिक महिला दिवस उत्साहात

अमळनेरात जागतिक महिला दिवस उत्साहात

0
55

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल  येथे जागतिक महिला दिवस उत्साहात संपन्न झाला.

शाळेचे प्राचार्य विकास चौधरी, त्याचप्रमाणे प्रा. प्रकाश महाजन आणि शिक्षक तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागराज माळी यांनी केले. अहिल्याबाई होळकर आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मानवंदना देण्यात आली. प्रियंका नंदुरबारे आणि महाजन सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे प्राचार्य  विकास चौधरी यांनी महिला दिनाचे महत्त्व ठामपणे पटवून दिले. शाळेच्या सर्व महिला शिक्षिकांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शाळेचे सर्व कर्मचारी व शिक्षकवृंद यांनी सहभाग घेऊन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

 

 

 

 


Protected Content

Play sound