रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महिलांनी समाजाच्या सर्वच क्षेत्रांत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. देशाच्या विकासात महिलांचे योगदान मोठे असून त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन तहसीलदार बंडू कापसे यांनी केले.
रावेर तहसील कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तहसील कार्यालयात कार्यरत सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तहसीलदार बंडू कापसे यांच्या हस्ते सुषमा घरडे (सहायक महसूल अधिकारी), डाळिंबी सरोदे (पुरवठा निरीक्षक), अंजुम तडवी (सहायक महसूल अधिकारी), काजल पाटील, भाग्यश्री बर्वे, रोशनी शिंदे, रुपाली पाटील, नफिसा तडवी, दीपाली बंदुले, माधुरी महाजन, शारदा पाटील, नयना अवसळर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास नायब तहसीलदार आर. डी. पाटील, मंडळ अधिकारी विठोबा पाटील, अव्वल कारकून भूषण कांबळे, संजय गांधी निराधार योजनेचे मोहिते, पुरवठा विभागाचे किशोर शिंदे तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.यावेळी महिलांच्या सशक्तीकरणावर चर्चा झाली. महिलांनी आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारावा, अधिक जबाबदारीने काम करावे आणि समाजातील प्रत्येक घटकाने महिलांचा सन्मान करावा, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.