Home Cities जळगाव डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद कॉलेजमध्ये जागतिक महिला दिवस उत्साहात

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद कॉलेजमध्ये जागतिक महिला दिवस उत्साहात


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, जळगाव खुर्द येथे जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत समाजातील महिलांच्या योगदानावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. कोमल खंडारे आणि डॉ. मयुरी चौधरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांच्या सशक्तीकरणाबाबत महत्त्वपूर्ण विचार मांडले आणि आयुर्वेद क्षेत्रातील महिलांच्या भूमिका अधोरेखित केल्या.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी महिलांच्या योगदानावर आधारित प्रेरणादायी विचार मांडले.

संपूर्ण वातावरण प्रेरणादायी आणि आनंददायी होते. महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित सर्व महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले यांनी सर्व आयोजकांचे अभिनंदन केले.


Protected Content

Play sound