पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा येथील रिजवान पठाण यांची दिल्ली (नोऐडा) येथे होणाऱ्या यु. बी. कप आंतरराष्ट्रीय टी – १० क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दि. २७ डिसेंबर पासून पाच दिवस ही स्पर्धा खेळली जाणार असून स्पर्धेचा अंतिम सामना दि. ३१ डिसेंबर रोजी नोएडा येथे होणार आहे. या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या क्रिकेट स्पर्धेत मुंबई स्टार्स, कोलकत्ता किंग्स, पंजाब लायन्स, चेन्नई वारियर, गुजरात टायगर आणि दिल्ली चॅम्पियन असे सहा संघ सहभागी होणार आहेत.
कॅनडा येथील यू. बी. कंपनीने या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे प्रायोजकत्व केले असून या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या फलंदाज आणि गोलंदाज क्रिडापटूंचा थायलंड आणि बँकॉक येथे होणाऱ्या १२ देशांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणार असल्याने या स्पर्धेकडे क्रीडा जगताचे लक्ष लागून आहे.
रिजवान पठाण याने या अगोदर देखील राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार खेळाचे प्रदर्शन केले असून यापूर्वी झालेल्या टी – १० स्पर्धेत रिजवानने १२६ रन आणि ९ विकेट अशी अष्टपैलू कामगिरी नोंदवलेली आहे. पंजाब लायन्स टीमचा कर्णधार अर्जुन सिंग याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघात अष्टपैलू रिजवान पठाण सह शकील, हिमांशु सैनी, सबिरा, चंद्र मोहन, विक्रांत प्रतापसिंग, राॕबिन, गुरुप्रीत सिंग, स्वतंत्र यादव, गुरूप्रीतसिंग गील, इशक शेख, कपिल भाटी, देवेंद्र, जय गुप्ता, दिपक बाग्री, विशाल बोहट, रोहित पांडे या खेळाडूंची निवड झाली आहे.
या मानाच्या स्पर्धेत रिजवान ची निवड खानदेव वासियांसाठी अभिमानाची बाब असून त्याच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे. रिजवान पठाण यांच्या अथक परिश्रमाचे श्रेय त्याने भाऊ डॉ. तोशिफ खान, वडील फियाज खान, संपूर्ण परिवार व मित्रांना दिले आहे.