नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्र सरकारने पीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधीवर ०.१० टक्के वाढ करण्यात आली आहे.
आज ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टची बैठक पार पडली. या बैठकीत पीएफवरील व्याज दर वाढवण्यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे भविष्य निर्वाह निधीवरच्या व्याज दरात वाढ करण्यात आली आहे. नोकरदारांना दिलासा देणारा हा निर्णय ठरला आहे. २०१८-१९ या वर्षासाठी ही वाढ लागू करण्यात आली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीआधी विविध स्तरांमधील नागरिकांना खूश करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारतर्फे करण्यात येत आहे. या अनुषंगाने आजचा निर्णयदेखील याच प्रकारातील असल्याचे मानले जात आहे.