भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एन.के.नारखेडे स्कूल भुसावळच्या वतीने आंतरशालेय विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा दि.१४ सप्टेंबर २०२४ घेण्यात आली होती.या स्पर्धेत एकूण ९ शाळांनी सहभाग घेतला.या स्पर्धेत ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ ही शाळा प्रथम क्रमांकाने विजेता ठरली होती. सदर आंतरशालेय विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये ताप्ती पब्लिक स्कूल,भुसावळ यांचे विद्यार्थी अमित झनके,भार्गवी तळेले,निधी फेगडे,आर्या सराफ सहभागी होते.
या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका निना कटलर आणि विज्ञान शिक्षक मोहम्मद कय्युम मोहम्मद अय्युब शेख यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. सदर स्पर्धेमध्ये विजयी संघांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आज दि.२१ सप्टेंबर २०२४ रोजी एन.के.नारखेडे विद्यालय भुसावळ येथे आयोजित करण्यात आलेले आहे.याप्रसंगी विज्ञान शिक्षक कय्युम शेख यांच्यांशी केलेल्या चर्चेबाबतचा इतिवॄतांत.