रावेर प्रतिनिधी । येथील श्रीराम मॅक्रो व्हिजन ॲकेडमीत सी.बी.एस.ई इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आज दि. 29 ऑगस्ट रोजी बुध्दीबळ स्पर्धा घेण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, शाळेतील इ. 4 थी ते 12 वी च्या विद्यार्थी विद्यार्थीनींनी बुध्दीबळ स्पर्धेत उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला असून स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी संस्थाध्यक्ष श्रीराम पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. तीन गटांमध्ये बुध्दीबळ स्पर्धा पार पडली. पहिला गट इयत्ता 4 थी ते 6 वी, दुसरा गट इयत्ता 7 वी ते 9 वी आणि तिसरा गट इयत्ता 10 वी ते 12 वी पर्यंत असा होता.
आजच्या बुध्दीबळ स्पर्धेत विजेते विद्यार्थी जसे मुलींच्या गटातील प्रथम आलेल्या डॉली करात, दुसऱ्या गटात भुमिका भारद्वाज आणि तिसऱ्या गटात प्रथम मोनाली कोळंबे, द्वितीय साक्षी लोहार, तृतीय गुंजन बोंडे विजयी ठरले. तर मुलांमध्ये पहिल्या गटात प्रथम विवेक पाटील, द्वितीय मोक्षक पाटील, तृतीय सोहम पाटील, दुसऱ्या गटात प्रथम मनिष महाजन, द्वितीय सारंग बारेला, तृतीय वेदांग महाजन तिसऱ्या गटात प्रथम हितेश चौधरी, द्वितीय देवांश अग्रवाल, तृतीय दिव्येश सावळे विजयी ठरले. प्रथम आलेल्या स्पर्धकांना सुवर्ण पदक, द्वितीय आलेल्या स्पर्धकांना रजत पदक आणि तृतीय आलेल्या स्पर्धकांना कांस्य पदकाने गौरविण्यात आले. बुध्दीबळ स्पर्धेच्यावेळी प्रमुख उपस्थिती शाळेचे प्रशासक किरण दुबे, प्राचार्या कविता शर्मा उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना बुध्दीबळ स्पर्धेचे मार्गदर्शन शारिरीक शिक्षक अनिल भिंगाणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे प्रशासक, प्राचार्या, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले आहे.