जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील अयोध्या नगरातील बांधकाम व्यावसायिकाला प्लॉट विक्रीच्या कारणावरून दोन जणांनी शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, विनोद प्रतापराव कंडारे (वय-५६) रा. सिध्दीविनायक मंदीर, अयोध्यानगर, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवारी ११ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सुप्रिम कॉलनीतील इम्रान सलीम पटेल आणि आरीफ सलीम पटले यांनी प्लॉट विक्रीच्या कारणावरून विनोद कंडारे यांना शिवीगाळ व दमदाटी केली. याबाबत विनोद कंडारे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून रात्री ९ वाजता इम्रान सलीम पटेल आणि आरीफ सलीम दोन्ही रा. सुप्रीम कॉलनी यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.