पुणे प्रतिनिधी । शहरात सध्या भाजपचे आठ आमदार आहेत. अशा परिस्थितीत युतीच्या वाटाघाटीत पुण्यातील जागा ही शिवसेनेला न देता मुंबईतील विद्यमान जागा द्यावी, असे खासदार गिरीश बापट यांनी एका कार्यक्रमानंतर माध्यमांना सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, बापंट यांनी पुण्यात शिवसेनेला देण्यात येणाऱ्या जागांवर मत व्यक्त केले. पुण्यात आठही मतदारसंघ भाजपचे असल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते चिंतेत आहेत. युतीच्या वाटाघाटी शहरातील एकही जागा सेनेला मिळाली नाही. तर त्यांना अजून पाच वर्षे वाट बघावी लागणार आहे. चार नाही पण निदान तीन जागा मिळाव्यात अशा मागणी त्यांनी यावेळी केली आहे. महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष विरोधात लढले होते. त्यामुळे आता युतीच्या वाटाघाटी पुण्याच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.