यावल प्रतिनिधी | शहराला लागून असलेल्या खड़काई नदीच्या उत्तर क्षेत्रात डॉ.जाकिर हुसेन ऊर्दू हायस्कूलकडे जाणाऱ्या मार्गावर खड़काई नदीवर जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून वाहतुकीसाठीचा पूल बांधलेला आहे.
मात्र आजपर्यंत या पूलावर आजूबाजूने संरक्षणसाठी कठडे बसवलेले नाही. यामुळे वाहन पूलावरून कोसळून मोठा अपघात होऊ शकतो. जीवित हानी होण्याची शक्यता आहे. या मार्गावर शासकीय आय.टी.आय व डॉ. जाकिर हुसेन ऊर्दू हायस्कूल व कॉलेज, तसेच लहान मुलांची जे टी महाजन इंग्लीश मिडीयम शाळादेखील आहे .
त्यामुळे मार्गावरील रस्त्याने असंख्य वाहनाची वर्दळ नेहमीच असते .
या रस्त्याने विद्यार्थ्यांच्या वापर अधिक प्रमाणावर असल्यामुळे अपघाताची अप्रिय घटना घडू नये म्हणून या पुलावर पादचारी व वाहनाच्या सुरक्षेतसाठी पूलाच्या दोघं बाजूने तात्काळ नवीन कठडे बसवण्यात यावे. त्याचप्रमाणे जे.टी महाजन शाळा, शासकीय विश्रामगृहापर्यंत रस्त्यांच्या कडेला दोन्ही आजूबाजूने वाढलेली झाडाची काटेरी झाडे झुडपेमुळे वाहन व शाळेतील विद्यार्थ्याना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी लवकरात लवकर पुलावर संरक्षण कठडे बसवणे त्यात रस्त्यावर लगत काटेरी झाडे झुडपे काढावीत.” अशी मागणी एका निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष आरिफ खान, अय्युब खान व कॉंग्रेसचे कार्यकर्ता विक्कि गजरे यांनी जिल्हाधिकारी जळगाव, यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद बांधकाम विभाग यावल यांना केली आहे.