Home Cities जळगाव जेष्ठ नागरिक दिनानिमित्त वासुदेव जेष्ठ नागरिक संघाचा प्रेरणादायी उपक्रम

जेष्ठ नागरिक दिनानिमित्त वासुदेव जेष्ठ नागरिक संघाचा प्रेरणादायी उपक्रम


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । १ ऑक्टोबर रोजी ‘जागतिक जेष्ठ नागरिक दिना’चे औचित्य साधून वासुदेव जेष्ठ नागरिक संघाने एक वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवला. समाजातील जेष्ठ नागरिकांचा सन्मान, त्यांचा अनुभव आणि योगदान याची जाणीव करून देण्यासाठी प्रभागामध्ये प्रभातफेरी काढून जनजागृती करण्यात आली. टाळ-मृदुंगाच्या साथीने, हरिनामाच्या गजरात घोषणांनी प्रभाग दुमदुमला आणि संपूर्ण परिसरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.

ओम सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठान संचलित “वासुदेव जेष्ठ नागरिक संघ” यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ही प्रभातफेरी आयोजित केली. प्रभातफेरीची सुरुवात रींग रोड जवळील संघाच्या कार्यालयापासून झाली आणि मुक्ताईनगर, गणेश कॉलनी, डॉ. मोरे यांचे निवासस्थान, गणेश मित्र मंडळ, विशाल जंगले यांचे घर, मोहित नगर, नारायण नगर, भिरूड कॉलनी, गोदावरी नगर मार्गे योग केंद्र येथे समारोप झाला.

या फेरीदरम्यान “जेष्ठांचा सन्मान करा, त्यांच्या अनुभवाचा आदर करा”, “ज्ञानाचा भांडार, अनुभवाचा आधार, जेष्ठ नागरिक आहेत समाजाचा मान”, “वृद्ध नाही, ते आहेत अनुभवाची खाणी, करू त्यांचा सन्मान, हीच आमची वाणी”, अशा सामाजिक संदेश देणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. हरे राम-हरे कृष्णच्या गजराने वातावरण भक्तिमय झाले होते.

या उपक्रमात वासुदेव जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील,सचिव सतीश जंगले ,भानुदास पाटील, संजीव चौधरी, प्रमोद बोरोले, धनराज पाटील, प्रभाकर झांबरे, पांडुरंग पाटील, ज्ञानदेव पाटील, सुनील सूर्यवंशी, डॉक्टर अशोक डाके, सुरेश नेहेते, विश्वनाथ वाणी, अशोक नेहेते, प्रकाश पंडित पाटील, लीलाधर पाटील, नरेंद्र महाजन, डी एस चौधरी ,श्रीमती लता चौधरी, भास्कर खाचणे, आर एल् चौधरी गणेश सरोदे, हरी नाटू पाटील, लता जंगले, श्रीमती विजया पाटील, श्रीमती इंदुबाई सपकाळे ,पुंजो भा रंबे ,रमण भोगे सर ,सुरेश करंदीकर, मोतीराम चौधरी, यशवंत मोतीराम वारके, दत्तात्रय चौधरी, सोपान नेमाडे ,शरद पाटील, मंगल दादा कोळी ,विश्वनाथ वाणी, सतीश मराठे, सर श्रीमती ज्योती चौधरी, सौ विजया पाटील आदी सदस्य प्रभातफेरी मध्ये सहाभागी होते. सर्व सहभागी सदस्यांनी जेष्ठांच्या सन्मानासाठी एकत्र येण्याचे महत्व अधोरेखित केले.

या उपक्रमाने प्रभागात केवळ एक जनजागृतीच झाली नाही, तर समाजातील नव्या पिढीनेही जेष्ठांच्या अनुभवाला योग्य स्थान द्यावे, याचा प्रेरणादायी संदेश दिला.


Protected Content

Play sound