Home Cities यावल संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेळगाव बॅरेजची पाहणी ; जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे पाणी...

संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेळगाव बॅरेजची पाहणी ; जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे पाणी काटकसरीने वापरण्याचे निर्देश!

0
6

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील तसेच जळगाव जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता पाण्याचे योग्य नियोजन आणि काटकसरीने वापर करण्याच्या सूचना राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या. १४ नोव्हेंबर रोजी त्यांनी यावल तालुक्यातील शेळगाव बॅरेज या मध्यम प्रकल्पाला भेट देऊन जलसाठ्याची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रकल्पातील पाणीसाठ्याची माहिती जाणून घेतली.

यावल शहरासह भुसावळ आणि परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या शेळगाव बॅरेज प्रकल्पाला या भेटीमुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलसाठ्याचा विनियोग कशा पद्धतीने करायचा, याबाबत मंत्री महाजन यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले. उपलब्ध पाणीसाठा जपून वापरणे, पाण्याचे योग्य नियोजन करणे तसेच भविष्यातील गरजा लक्षात घेऊन काटकसरीने पाणीवापर करण्याबाबत त्यांनी तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound