राष्ट्रीय महामार्ग बायपास कामांची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून पाहणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहराच्या बाहेरून गेलेल्या पाळधी ते तरसोद दरम्यानच्या बायपास गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी शुक्रवारी २९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट देवून कामाची पाहणी केली आहे. दरम्यान कामाला गती देण्याच्या सुचना त्यांनी संबंधित विभागाच्या प्रमुख अधिकारी यांना दिल्या आहेत.

विधानसभा निवडणूकीच्या कामातून जळगाव जिल्हा प्रशासन मुक्त झाले आहे. त्यानंतर जिल्ह्यातील प्रलंबित असलेले विकास कामे पुर्ण करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सुचना दिल्या होत्या. यातील महत्वाचा भाग म्हणून जळगाव शहराच्या बाहेरून गेलेला पाळधी ते तरसोद बायपास राष्ट्रीय महामार्गाचे काम विधानसभा निवडणूकीमुळे रखडले होते. राष्ट्रीय महामार्गाचे कामाचा विषय हा अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी २९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता राष्ट्रीय महामार्गाच्या बायपासच्या सुरू असलेल्या ठिकाणी जावून कामाची पाहणी केली. दरम्यान हे काम युध्द पातळीवर करून तो पुर्ण करण्याचा वेग वाढविण्याच्या सुचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Protected Content