विसर्जन मिरवणूक रस्त्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते मेहरूण तलाव श्री गणेश घाटपर्यंतच्या विसर्जन मिरवणूक रस्त्यांची पाहणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह पोलीस अधिक्षक आणि महापालिका आयुक्त यांनी शुक्रवारी १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता करण्यात आली. यावेळी गणेश भक्तांसह मंडळाच्या सदस्यांना कोणतीही अडचण भासणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बोलतांना दिली आहे.

याबाबत अधिक असे की, गेल्या शनिवारी ७ सप्टेंबर रोजीपासून गणरायाचे आगमन झाल्यानंतर प्रशासनाची आता विसर्जन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर मुळे, तहसीलदार यांनी शुक्रवारी १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते मेहरूण तलाव श्री गणेश घाटपर्यंतच्या विसर्जन मिरवणूकीच्या रस्त्याची पाहणी केली. पाच किलोमिटरचा हा रस्ता पायी चालत रस्त्यांची पाहणी करत असतांना रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांसंदर्भात सुचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. विसर्जन मिरवणूकीत कुणालाही दुखापत, त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अश्या सुचना संबंधित विभागाला देण्यात आले आहे.

Protected Content