चोपडा प्रतिनिधी । येथील इनरव्हील क्लब ऑफ चोपडाच्यावतीने ‘प्लास्टिक मुक्ती’ संदर्भात शालेय पातळीवर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या निबंध स्पर्धेत शहरातील प्रताप विद्या मंदिर, महिला मंडळ माध्यमिक विद्यालय, बालमोहन माध्यमिक विद्यालय, विवेकानंद विद्यालय, मिमोसा इंग्लिश मीडियम स्कूल या शाळा सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, शालेय साहित्य देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी शाळांमधील मार्गदर्शक शिक्षकांचा यावेळी कापडी पिशव्या देऊन गौरव करण्यात आला. इनरव्हील क्लबतर्फे आयोजित निबंध स्पर्धेच्या बक्षिस वितरणप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शहरातील अस्थिरोग तज्ञ डॉ. नरेंद्र शिरसाठ, बालरोग तज्ञ डॉ. नीता जैस्वाल, भगिनी मंडळ संस्थेच्या अध्यक्षा पुनम गुजराथी, उपाध्यक्ष छाया गुजराथी, ललित कला केंद्राचे प्राचार्य. राजेंद्र महाजन, महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चौधरी यांच्यासह इनरव्हीलच्या डिस्ट्रिक सेक्रेटरी अश्विनी गुजराथी, क्लब प्रेसिडेंट डॉ. कांचन टिल्लू, सेक्रेटरी चेतना बडगुजर हे मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांना डॉ नरेंद्र शिरसाट यांनी प्लास्टिक वापराचे धोके, पर्यावरणावर होणारा परिणाम, प्लास्टिक वापराबद्दलचे मार्गदर्शक तत्त्वे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच प्लास्टिकमुक्ती बद्दलची ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बारी यांनी, प्रास्ताविक डॉ.कांचन टिल्लू यांनी तर आभार प्रदर्शन चेतना बडगुजर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्लब सदस्य शीला शेलार, लता छाजेड, ज्योती वारके, ज्योती चौधरी, नीतू अग्रवाल, चंचल जयस्वाल, नीता अग्रवाल, पारुल जैन, अंजली बरडीया, किरण पालीवाल यांनी परिश्रम घेतले.