इनरव्हील क्लब शाखेचा पदग्रहण समारंभ संपन्न

bhusaval padagrahan

भुसावळ प्रतिनिधी । विविध सामाजिक कार्यात नेहमीच तत्पर राहणारे विश्वव्यापी इनरव्हील क्लब भुसावळ शाखेचा पदग्रहण समारंभ नुकताच संपन्न झाला आहे.

या वर्षांचा अध्यक्ष होण्याचा मान शहरातील सु-परिचित व्यक्तिमत्त्व स्वाती देव यांना मिळाला आहे. पास्ट पीपी नूतन फालक यांच्याहस्ते हा पदभार प्रदान करण्यात आला. या समारंभाच्या प्रमुख अतिथी म्हणून डॉ. रश्मी शर्मा (C C C C )यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या वर्षांची नुतन कार्यकारिणी गठित करण्यात आली असून अध्यक्ष स्वाती देव, उपाध्यक्ष आशा पाटील, सचिव वंदिता पारे ट्रेझरर राजश्री कात्यायनी, आयएसओ रुचिका शर्मा, सी.सी.अलका भटकर, एक्झिकेटिव्ह मेंबर संगीता चांडक, रजनी सावकारे, शीतल भराडिया, शशिकला लाहोटी, अत्या अन्सारी, कांचन जोशी या पदग्रहण समारंभाच वैशिष्ट म्हणजे पदग्रहणभव्य दिव्य थाटात न करता त्यावरील सर्व खर्च हा समाज उपयोगी उपक्रमासाठी खर्च व्हावा हा नवा आदर्श स्वाती देव यांनी निर्माण केला.

शहर प्लास्टिक मुक्त व्हावं हा प्रण यावेळी करण्यात आला. पाण्याचं दुर्भिक्ष लक्षात घेऊन रेन वॉटर हार्वेस्टिंग चा प्रकल्प शहरातील दवाखाने शाळा यांना दत्तक घेऊन राबवण्यात येईल अशा नूतन अध्यक्षांनी जाहिर केले. अनाथ मुक्त भारत पर्यावरणपूरक आणि विद्यार्थ्यांना तयारी अभ्यासाची असे प्रोजेक्ट राबवण्यात आले. मिशन ममता अनाथ मुक्त भारतच्या चेअरमन व सब प्रेसिडेंट संविधान ऑफ इनर व्हील तयार करण्याच्या पदावर नियुक्त असलेल्या डॉ. रश्मी शर्मा यांचे सुद्धा अनमोल मार्गदर्शन या नव्या टीमला झाले. या कार्यक्रमासाठी पीडीसी रत्नकांत अग्रवाल, सीनियर मेंबर विमल राव, शोभा भोळे, नीता चोरडिया, मनीषा तायडे, मनिषा राणे, मनीषा काबरा, पास्ट प्रेसिडेन्ट कमल सचदेव, वंदना चांडक, रुशाली पाटील आदी उपस्थितीत होते.

Protected Content