मुंबई (वृत्तसंस्था) काँग्रेसचा समावेश असलेल्या महाआघाडीचे नवे सरकार स्थापन होत असतांनाच ईडीकडून आदर्श घोटाळ्याची चौकशी सुरू केली आहे. या नव्या सरकारमध्ये काँग्रेस नेते आज अशोक चव्हाण मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच आदर्श घोटाळ्याची चौकशी सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कुलाबा येथील वादग्रस्त आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेतील घोटाळ्याची अंमलबजावणी संचलनालयाकडून पुन्हा चौकशी सुरू झाली आहे. हा आदर्श घोटाळा उघडकीस आल्यानंतर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात अशोक चव्हाण हे देखील शपथ घेण्याची शक्यता आहे. चव्हाण यांना आदर्श घोटाळा उघडकीस आल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता मंत्रिपदाची शपथ घेण्याआधीच त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे. ईडीने आदर्श घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू केली आहे. ईडीचे अधिकारी बुधवारी कुलाबा येथे आदर्श गृहनिर्माण संस्थेत पोहोचले आणि त्यांनी फ्लॅटमधील मोजणीही केली. याबाबत अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले.