जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील महात्मा फुले विकास महामंडळात झालेल्या भ्रष्ट्राचाराची तात्काळ चौकशी करुण दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. परंतू चौकशी पूर्ण होईपर्यंत इतर प्रकरणे थांबवू नये, या आशयाचे निवेदन नुकेतच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने समाज कल्याण आयुक्तांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, ज्या गरजू होतकरू बेरोजगारांनी प्रकरणे टाकलेले आहेत. त्यांची प्रकरणे मंजूरीसाठी पाठवावे. उगाच चौकशी होईपर्यंत शासनाने बाकीच्या लोकांना वेठीस धरू नये. बेरोजगारांना तात्काळ उद्योग व्यवसायाकरिता अर्थसहाय्य देण्यात यावे. तर ज्यांनी भ्रष्ठचार केला आहे. त्यांच्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा प्रमुख आनंद बाविस्कर यांनी समाज कल्याण आयुक्तांना निवेदना द्वारे केली आहे. यावेळी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज सोनवणे,युवा जिल्हा कार्याध्यक्ष अशोक तायडे, युवक महानगर प्रमुख मिलींद सोनवणे,शांताराम आहीरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.