राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या कामांची चौकशी करा – प्रदीप साळी

जळगाव प्रतिनिधी । वरणगाव जवळील राष्ट्रीय महामार्गावर होत असलेल्या निकृष्ट कामाची चौकशी करावी, अशी मागणी नशिराबाद येथील झिअम फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रदीप साळी यांनी पंतप्रधान यांच्याकडे ई-मेल द्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यातील वरणगावच्या पुढे गवार कंपनीकडून राष्ट्रीय महामार्गाचे रस्ता बनविण्याचे काम सुरू आहे. या कामावर आर.बी. असोसिएशन लक्ष ठेवण्याचे काम करतात. दरम्यान उड्डाणपुलाजवळ सुरू असलेल्या भरावाच्या कामा प्लॅश, कचरा, मिक्स राख व माती मिक्स मुरूम वापरून भर टाकला जात आहे. याची तक्रार प्रकल्प व्यवस्थापकाकडे केली असता त्यांच्याकडून उडवाउडवी उत्तरे दिलीत. माझ्या पध्दतीने काम सुरू आहे. तुम्हाला काय करायचे आहे ते करा असा दम दिला. दरम्यान कामावर देखरेख ठेवणारे आर.बी.असोसिएशनचे अधिकारी कर्नल यांच्याकडेही तक्रार केली असता त्यांनी देखील वर हाता झटकले आहे. राष्ट्रीय महामार्गावर होत असलेल्या कामाचा दर्जा निकृष्ट होत असल्याने प्रवाश्यांच्या जीवाशी खेळल्याचा प्रकार होत आहे. दरम्यान आर.बी. असोसिएशनचे अधिकारी किरण वैध यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून काही सॅम्पल त्यांनी दिल्ली येथे तपासणीसाठी रवाना केले आहे. तसेच सुरू असलेले काम थांबविण्याचे आदेश दिले आहे. या तक्रारीची प्रत झिअम फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रदिप साळी यांनी पंतप्रधान यांना ईमेल द्वारे केली आहे.

 

Protected Content