अमळनेर( प्रतिनिधी) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थाना उन्हाळी सुटी सुरु होईपर्यंत मनोरंजनार्नात्मक शिक्षण देण्याचा उपक्रम पारोळा तालुक्यातील धाबे येथे मागील पाच वर्षापासून पंचायत समिती पारोळा गट शिक्षणाधिकारी चंद्रकांत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम चालविला जात आहे. मागील वर्षी बार्टीचे समतादूत योगेश पारधी, शेळावे यांनी जवळ जवळ आठवडाभर रोज मनोरंजनातुन, जादुचे वैज्ञानिक प्रयोग दाखवुन व ते विदयार्थ्यांकडुन करुन घेतले. त्यामागचे विज्ञान विदयार्थ्यांच्या लक्षात आणुन बुवाबाजी, चमत्कार व अंधश्रध्दा निर्मुलनाचे धडे दिले होते. यावर्षी पाठकोरे कागदांचा वापर करण्याचे शिकविले जात आहे.
ही प्रचार पत्रके जमवुन व पारोळा शहरातील सामाजिक कार्यकर्ता पिरन अनुष्ठान यांनी वापरात नसलेली कालबाह्य हजारो प्रचार पत्रके शाळेला भेट दिली. यापासुन मुख्याध्यापक साळुंखे यांनी मुलांना दोऱ्याने शिवुन वह्या तयार करून दिल्या. त्यावर विदयार्थांना गृहपाठ करून आणण्याची सवय लावली. साळुंखे यांच्या पत्नी चित्रा पाटील यांनी त्यांच्याकडे रोज येणाऱ्या दहा वृत्तपत्रांमधुन येणारे प्रचार पत्रके एका ठिकाणी जमविणे सुरू केले. त्याचप्रमाणे वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांनीही त्यांच्याकडे जमा झालेली अशी शेकडो प्रचार पत्रके शाळेत आणून दिली. आजपासुन मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांनी पुन्हा त्यांच्या कोऱ्या भागावर लेखनाचा प्रकल्प सुरू केला. लेखन केल्यानंतर त्याच कागदावर पुन्हा रंगीत कागदाचे तुकडे चिटकवुन कोलाज, मुद्राचित्रे, कागदी खेळणे बनविण्याचाही उपक्रम घेतला जाणार आहे. यावेळी मुख्याध्यापक साळुंखे यांनी सर्वांना विनंती केली आहे की, कागद बनविण्यासाठी वृक्षतोड केली जाते. आपल्या घरात, बाजारात किंवा इतरत्र आपल्याला अनेक प्रकारची प्रचार पत्रके मिळतात. आपण वाचुन फेकुन देतो, फाडुन टाकतो, जाळुन टाकतो किंवा कचरा कुंडीत टाकतो. आता असे न करता ही कागदे एका ठिकाणी ठेवा किंवा जमवा. काही तरी हिशोब करण्यासाठी, किराणा मालाची यादी करण्यासाठी किंवा अन्य लेखन करण्यासाठी वापरा. आपल्या घरात विदयार्थी असतील तर त्यांना कोऱ्या भागावर काही तरी लेखन करण्यास प्रोत्साहित करा. त्या कागदाचा सदुपयोग करण्याचे समाधान लाभेल. पर्यावरण रक्षणालाही हातभार लागेल. पं. स. पारोळा शिक्षण विस्तार अधिकारी कविता सुर्वे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून सर्वच शाळांनी उन्हाळी सुटी लागेपर्यंत मनोरंजनातुन शिक्षण हा उपक्रम राबवावा असे आवाहन केले आहे.