जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ७ वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य करून खून केल्याच्या आरोपातून एकाची जळगाव जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता करण्यात आल्याचा निकाल दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील टोनगांव येथे ७ वर्षीय मुलगा आपल्या आईवडीलांसह वास्तव्याला होता. २१ मार्च २०१९ रोजी दुपारी गावातील ७ वर्षीय मुलगा अंगणात खेळत असतांना पळवून नेल्याप्रकरणी भडगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, २२ मार्च रोजी बेपत्ता झालेल्या सात वर्षीय मुलाचा मृतदेह पाचोरा रोडवरील एका केळीच्या शेतात आढळून आला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. भडगाव पोलीसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून यश उर्फ गोलू उर्फ गिरमिट उर्फ साबन उर्फ खूपश्या चंद्रकांत पाटील याला अटक करण्यात आली होती. यात अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य करून केल्याचे निष्पन्न झाले होते.
यात संशयित आरोपी खूपश्या चंद्रकांत पाटील याच्याविरोधात जळगाव न्यायालयातील न्यायमुर्ती एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्यात एकुण बारा साक्षिदार तपासण्यात आले. या खटल्यात आरोपीविरोधात सबळ पुरावा नसल्याने न्यायमुर्ती एस.जी.ठुबे यांनी खूपश्या चंद्रकांत पाटील याची निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपीतर्फे ॲड. मंजूळा के. मुंदडा यांनी कामकाज पाहिले.