Home Uncategorized हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक !

हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हद्दपारीचा आदेश झुगारून शहरात वास्तव्य करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना शनिपेठ पोलिसांनी बुधवारी २० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता ताब्यात घेतले आहे. गोपनीय माहितीच्या आधारावर पोलिसांनी ही धडक कारवाई केली. तेजस दिलीप सोनवणे याला उपविभागीय दंडाधिकारी, जळगाव यांनी, तर सागर उर्फ बीडी सुरेश सपकाळे याला पोलीस अधीक्षक कार्यालयाने एका विशिष्ट कालावधीसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले होते. मात्र, हे दोन्ही आरोपी कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय आपल्या राहत्या घरी राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

२० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता पेट्रोलिंग दरम्यान, दोन्ही आरोपी कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय आपल्या राहत्या घरी राहत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. माहितीची खात्री करण्यासाठी निरीक्षक कमलाकर यांनी त्यांच्या पथकातील गणेशकुमार नायकर, दिपक गजरे, शशिकांत पाटील, गणेश ढाकणे, नवजीत चौधरी, आणि काजोल सोनवणे यांना सोबत घेऊन शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दोन्ही गुन्हेगाराच्या घरावर त्यांनी छापा टाकला. त्यावेळी दोन्ही आरोपी त्यांच्या घरातच मिळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही घटनांनी पोलीस यंत्रणेची सतर्कता दिसून येते. हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलीस करडी नजर ठेवून आहेत, असा स्पष्ट संदेश या कारवाईने दिला आहे.


Protected Content

Play sound