जळगाव (प्रतिनिधी) सामाजिक न्याय विभागातर्फे कार्यरत असलेल्या मागसवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, सिंधी कॉलनी जळगाव येथे सन 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यालयीन विभागासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे.
विद्यार्थिनींनी वसतिगृह प्रवेशासाठी प्रचलित जुन्या पध्दतीनुसार लेखी प्रवेश अर्ज भरुन त्वरीत वसतिगृह कार्यालयात जमा करावेत. असे आवाहन गृहपाल, मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. विद्यालय विभागाच्या अनुसुचित जाती-05, विशेष मागास प्रवर्ग-01, अपंग-01, अनाथ-01 याप्रमाणे जागा रिक्त आहेत. त्यामुळे ज्या वर्गवारीच्या जागा रिक्त आहे त्याच वर्गवारीच्या विद्यार्थिनींना वसतिगृह गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाईल, असेही गृहपाल यांनी कळविले आहे.