आर्थिक मंदीमुळे इन्फोसिस 12 हजार कर्मचाऱ्यांना काढणार

31 1572935438

 

बंगळुरू (वृत्तसंस्था) आर्थिक मंदीमुळे इन्फोसिस आपल्या 12 हजार कर्मचाऱ्यांना काढणार असल्याचे वृत्ताने खळबळ उडाली आहे. इन्फोसिस १० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याची माहिती आहे. याअगोदर आयटी क्षेत्रातील मातब्बर कंपनी कॉग्निझंटने मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली होती.

सध्या देशात मंदीचे वातावरण असून, त्याची झळ आयटी कर्मचाऱ्यांना बसू लागली आहे. आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी इन्फोसिस मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. कंपन्या कर्मचाऱ्यांना काढताना विविध कारणे देत आहेत. त्यामध्ये कामातील असमाधानकारक कामगिरी हे प्रमुख कारण आहे. इन्फोसिसच्या वरिष्ठ पदांवर ९७१ अधिकारी आहेत. असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट, व्हाइस प्रेसिडेंट, एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट यासारख्या वरिष्ठ पदांवरील अधिकाऱ्यांनाही इन्फोसिस कामावरून काढणार आहे. या वरिष्ठ पदांवरील किमान ५० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जाणार आहे.

Protected Content