बोदवड प्रतिनिधी । शहरातील वार्ड क्रमांक 3 मध्ये सुरू असलेल्या बुद्धविहाराच्या संरक्षक भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने ते काम पाडून नवीन चांगल्या दर्जाचे काम करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बोदवड नगरपंचायत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बोदवड नगरपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्रमांक 3 मध्ये बुद्धविहाराला संरक्षण भिंतीचे काम सुरू आहे. परंतु संबंधित ठेकेदार ते काम अंदाजपत्रकानुसार करत नसून प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी निकृष्ट दर्जाची वाळू, विटा, खडी व सिमेंट याचा वापर केला जात आहे. त्याचप्रमाणे आरसीसीचे काम करत असताना त्यामध्ये वापरली जाणारी लोखंडी आसारी व सिमेंट हे प्रमाणित नुसान संबंधित ठेकेदार याबाबत काम करीत नाही. ठेकेदार हे कमी व निकृष्ट दर्जाचे साहित्य व प्रमाणाचे वापर करत असतात. निकृष्ट दर्जाचे काम करून ठेकेदारांना जास्त प्रमाणात नफा मिळावा या उद्देशाने काम करत आहे. याकडे संबंधित बांधकाम अभियंता देखील दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. त्यामुळे बुद्धविहाराचे होत असलेले निकृष्ट दर्जाचे संरक्षण भिंतीचे कामे तात्काळ थांबवून तोडण्यात यावे आणि नवीन चांगल्या दर्जाचे आणि अंदाजपत्रकात नमूद केल्यानुसार काम करण्यात यावे, जेणेकरून बौद्ध समाजाच्या भावना दुखावणार नाही याची दक्षता घ्यावी, असे न केल्यास वंचित बहुजन आघाडीचीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुकाध्यक्ष सुपडा निकम, जिल्हा सचिव नागसेन सुरळकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.