Home क्रीडा इंदूर कसोटी: कोहली दुसऱ्याच चेंडूवर आऊट

इंदूर कसोटी: कोहली दुसऱ्याच चेंडूवर आऊट

0
26

virat inner

इंदूर वृत्तसंस्था । भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांवर आटोपला. भारताचे पहिले ३ गडी अबु जायदने बाद केले. पुजारा अर्धशतकावर बाद झाल्यानंतर कोहली मैदानात उतरला. तो मोठी खेळी करेल असे वाटतानाच अबु जायद याने त्याला पायचीत पकडले. पंचांनी त्याला बाद ठरवले नाही, पण रिव्ह्यूमध्ये मात्र कोहलीला बाद ठरवण्यात आला.

बांगलादेश संघाचा कर्णधार मोमिनुल याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण पहिल्या डावात हा निर्णय त्यांच्या विरोधात गेला. त्यानंतर भारताच्या डावात कर्णधार विराट कोहली शून्यावर बाद झाला. कोहली गेल्या काही काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये धमाकेदार खेळी करत आहे. त्यामुळे बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या, पण तो दुसऱ्याच चेंडूवर शून्यावर माघारी परतला. दरम्यान, त्याआधी भारताच्या डावात सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. पण चेतेश्वर पुजारा आणि मयंक अग्रवाल या दोघांनी दमदार खेळी केली. या दोघांनी ९१ धावांची भागीदारी केली. पुजारा ५४ धावांवर माघारी परतला.


Protected Content

Play sound