मुंबई (वृत्तसंस्था) ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. १५ सदस्यांच्या भारतीय टीममध्ये अपेक्षेप्रमाणेच फारसे आश्चर्यकारक बदल करण्यात आले नाहीत. अंबाती रायुडूला मात्र वर्ल्ड कपच्या टीममधून डच्चू देण्यात आला आहे. तर ऋषभ पंत याच्याऐवजी दिनेश कार्तिकवर निवड समिती आणि विराट कोहलीने विश्वास दाखवला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वामध्ये भारतीय टीम हा वर्ल्ड कप खेळणार आहे, तर रोहित शर्मा उपकर्णधार आहे.
निवड समितीने जाहिर केलेल्या टीममध्ये हे खेळाडू आहेत. विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, विजय शंकर, महेद्रसिंह धोनी(यष्टीरक्षक), केदार जाधव, दिनेश कार्तिक, युजूवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी. भारतीय संघनिवडीची शेवटची तारीख 23 एप्रिल होती, मात्र आज आठ दिवस आधीच म्हणजे 15 एप्रिलला भारताचा 15 सदस्यीय वर्ल्ड कप संघ जाहीर होत आहे. एकदिवसीय विश्वचषकाला 30 मे पासून इंग्लंडमध्ये सुरूवात होत आहे. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार असून, 16 जून ला भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे.