पॅरीस-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. मनू आणि सरबजोत या भारतीय जोडीने १० मीटर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदकाच्या लढतीत कोरियाचा 16-10 असा पराभव केला.
पॅरिस ऑलिम्पिक टेबल टेनिस महिला एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये मनिका बत्राने सोमवारी रात्री उशिरा खेळल्या गेलेल्या राउंड ऑफ 32 सामन्यात फ्रान्सच्या पृथिका पावडेचा पराभव करून आपले स्थान निश्चित केले. ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारी मनिका ही पहिली भारतीय टेबल टेनिसपटू ठरली आहे.
जागतिक क्रमवारीत 28व्या स्थानी असलेल्या मनिकाने फ्रान्सच्या राजधानीतील दक्षिण पॅरिस एरिना 4 येथे जागतिक क्रमवारीत 18व्या स्थानावर असलेल्या पावडेचा 4-0 (11-9, 11-6, 11-9, 11-7) पराभव केला.