नवी दिल्ली, वृत्तसंस्था । भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांना कोरोना संसर्गची लागण झाली आहे. त्यांची चाचणी करण्यात आली होती, ती पॉझिटिव्ह आल्याने चंडीगढ येथील निवासस्थानी त्यांना आयसोलेट करण्यात आले आहे.
फ्लाइग सिख या नावाने प्रसिद्ध असलेले ९१ वर्षीय मिल्खा सिंग यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. आमच्या काही कर्मचाऱ्यांना कोरोना झाला, त्यामुळे आम्ही कुटुंबातील सर्वांनी चाचणी करून घेतली. त्याच फक्त माझी टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने मी हैराण झालो आहे.
मिल्खा सिंग म्हणाले. माजी प्रकृती पूर्णपणे ठिक आहे. ताप किंवा कफ नाही. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार ३-४ दिवसात मी ठिक होईन. कालच मी जॉगिंग केल्याचे त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलतांना सांगितले. याआधी मला कोरोनाची लस घेण्याची गरज वाटत नव्हती. पण आता जाणीव झाली की, ती घेतली पाहिजे आणि अन्य सर्वांनी देखील ती लवकर घ्यावी. संपूर्ण देशातील चाहत्याचे प्रेम आणि प्रार्थनेमुळे मी लवकर बरा होईन असे ते म्हणाले.
मिल्खा सिंग यांनी १९६० च्या रोम ऑलिंपिकमध्ये ४०० मीटर फायनलमध्ये चौथ्ये स्थान मिळवले होते. मिल्खा सिंग यांनी १९६०च्या रोम ऑलिंपिकमध्ये ४०० मीटर फायनलमध्ये चौथ्ये स्थान मिळवले होते. तर १९५८ आणि १९६२च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक मिळवले. मिल्खा यांचे पुत्र जीव मिल्खा सिंग गोल्फपटू आहेत. ते सध्या दुबईत असून पुढील आठवड्यात भारतात परत येणार आहेत.